कोपरगाव / प्रतिनिधी :- राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमे अंतर्गत काल {दि. २८} कोपरगाव शहरात पोलिओ लसीकरणाचा पहिला टप्पा राबविण्यात आला. तालुक्याच्या आ. स्नेहलता कोल्हे यांनी ग्रामीण रुग्णालय येथे नवजात तसेच शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ लस दिली. यावेळी नगरसेविका विद्या सोनवणे, हर्षा कांबळे, दीपा गिरमे, शिल्पा रोहमारे, नगरसेवक स्वप्नील निखाडे, दिनेश कांबळे, रविंद्र रोहमारे, वैद्यकीय अधिकारी कुंदन गायकवाड आदी उपस्थित होते. आशा केंद्रातील सोनम पटेकर, वैशाली वाघ, योगिता गउल, महेश छोडलाने या कर्मचाऱ्यांनी बसमधील प्रवाशांच्या बालकांना पोलिओ लस देऊन मोहिम राबविली. दरम्यान, लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशीही प्रत्येक वाड्यावस्त्यांवर घरोघरी जाऊन ही मोहिम राबविली जाणार आहे, अशी माहिती सोनम पटेकर यांनी दिली.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला राबविण्यात
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:45
Rating: 5