कोपरगाव / प्रतिनिधी :- अहमदनगर जिल्हा भारत स्काऊट गाईडच्या चिंतन दिनानिमित्त अहमदनगर येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सोमैया विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी घवघवित यश संपादन केले. मोठया गटात संध्या भाकरे तर लहान गटात प्रदीप पगारे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. दरम्यान, आष्टी येथे भारत स्काऊट गाईडचा जिल्हास्तरीय मेळावादेखील नुकताच संपन्न झाला. यावेळी खा. दिलीप गांधी यांच्या हस्ते पुरस्कार व प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्या सुनीता पारे यांनी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष समीर सोमैया, संचालक एस. मोहन, उपमहाव्यवस्थापक मधुकर दराडे, शाळा समन्वयक अश्विनी शेळके, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व ग्रा. प. सदस्य राहुल टेके, पर्यवेक्षक बी. टी. खळदकर, भारत स्काऊट गाईडचे शिक्षक संजय गडकर, उत्तम बर्डे, रामदास थोरात, संगीता क्षिरसागर, भारती वक्ते, सोनाली निकम आदींसह शिक्षक, पालक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
चित्रकला स्पर्धेत ‘सोमैया’चे सुयश
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:16
Rating: 5