Breaking News

इस्रो सहलीसाठी विध्यार्थ्यांची निवड : नवकार फाऊंडेशनच्या वतीने सत्कार

जामखेड/ ता.प्रतिनिधी/ - जामखेड तालुक्यातील ३ विद्यार्थ्यांची ईस्त्रो येथे वैज्ञानिक शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली असून, दि १५ रोजी या विद्यार्थ्यांनी जामखेड येथून इस्रोसाठी रवाना करण्यात आले. यावेळी जामखेड येथील नवकार फऊंडेशनच्या वतीने सत्कार करून त्यांना मिठाई वाटप करण्यात आली. 
जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने गेली दोन वर्षापासून ही सहल जात असून या सहलीचे आयोजन तत्कालीन मुख्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे हे आहेत. ग्रामीण भागातील मुलांना वैज्ञानिक माहिती व्हावी. यासाठी ईस्त्रो सहलीचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ही सहल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधीच आहे. या सहलीसाठी जामखेड तालूक्यातील उच्च प्राथमिक शाळेतील 31 विदयार्थीची निंबध स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांना जास्त गूण प्राप्त होतील अशा 9 विद्यार्थ्यांची तालुका स्तरावर निवड करून नगर येथे पाठविण्यात आले. या विधार्थ्यांमधून तीन विदयार्थी इस्रो सहलीसाठी निवडण्यात आले. यामध्ये तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शिऊर येथील वैष्णवी गोरख पवार, पिंपरखेड येथील वैषाली सुदाम कांरडे, व खुरदैठण येथील संध्या गहिनीनाथ इंगळे या तिन विद्यार्थी ची ईस्त्रो सहलीसाठी निवड करण्यात आली.याप्रमाणे दि १५ रोजी जामखेड येथून या विध्यांर्थीनीना रवाना करण्यात आले. यावेळी त्यांचा नवकार फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करून त्यांना मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष पत्रकार मिठूलाल नवलाखा, विस्तार अधिकारी बाबासाहेब माने , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे , शिक्षण विभागातील लिपिक सुनील भमुद्रे , विजय साळवे , मुख्याध्यापक संभाजी कोकाटे , उत्तम पवार, अशोक राऊत , बाबासाहेब नाकाडे पालक गहिनीनाथ इंगळे, सुदाम कांरडे, गोरख पवार, याच्या सह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.