Breaking News

माजी कृषीमंञी शरद पवार 27 जानेवारीला पारनेर दौ-यावर


पारनेर/प्रतिनिधी /- माजी आमदार कै वसंततराव झावरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त तालुक्यातील वासुंदे येथे 27 जानेवारीला शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी कृषीमंञी शरद पवार हेे या प्रसंगी उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार असल्याची माहीती माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी दिली.
राज्यातील शेतक-यांच्या अडचणी समजुन घेण्यासाठी माजी कृषीमंञी शरद पवार यांचा दौरा आखण्यात आला असुन, योगायोगाने पक्षाचे पारनेर तालुक्याचे माजी आमदार कै.वसंतराव झावरे यांचा द्वितीय पुण्यस्मरण 27 रोजी असुन तेच औचित्य साधुन शेतकरी मेळाव्याचे ओयोजन करण्यात आले आहे. तालुक्यात सध्या अनेक प्रश्न निर्माण झाले असुन शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याला चांगला भाव असला तरी सरकारने निर्यातमुल्य वाढवल्याने निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. शेतक-यांच्या मालास योग्य भाव मिळावा. यासाठी शरद पवार यांनी सतत संघर्ष केला आहे. ते केन्द्रात कृषीमंञी असताना शेतक-यांना 72 हजार कोटींची कर्जमाफी मिळाली होती. शेतक-यांच्या दुखाची जाणीव असलेले शरद पवार हे तालुक्याच्या दौ-यावर येत असुन,तालुक्यातील जनतेने वासुंदे येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी केले आहे.