Breaking News

जिल्हाधिकार्‍यांनी घेतले कचरा डेपोत भोजन !


सिंधुदुर्गनगरी,- जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शनिवारी मालवण आणि वेंगुर्ले नगरपालिका पालिकाना भेट देऊन राबवित असलेल्या विविध उपक्रमांची मा हिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी मालवण येथे डम्पिंग ग्राउंड, रॉक गार्डन येथे भेट देऊन उपक्रमांची पाहणी केली तर वेंगुर्ले कचरा डेपोत चक्क भोजन सुद्धा केले. स्वच्छ सर्वेक्षण अभियान’ अंतर्गत मालवण नगरपालिकेच्यावतीने राबविल्या जात असलेल्या स्वच्छता विषयक उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी नगरपालिकेला भेट दिली असताना येथील सभागृहात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी नगरसेवकांशी संवाद साधला.

जिल्ह्यातील नऊ नगरपालिका व नगरपंचायत स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सामील झाल्याचा मला आनंद वाटत आहे. आपला जिल्हा पहिल्या पहिल्या वीस क्रमांकात येण्यासाठी मेहनत घ्यावी. या अभियानातील दक्षिण किनारपट्टीवरील कमी लोकसंख्येच्या शहरांमधून स्वच्छतेसाठी मालवण शहाराकडून मोठ्या अपेक्षा आहेत म्हणून पहिल्या वीस नगरपालिक ांमध्ये आपली नगरपालिका येण्यासाठी प्रयत्न करा अशी सूचना नाही तर ताकीद समजून मेहनत घ्या. पूर्वी पेक्षा आताचे मालवण वेगळे आहे. येथील डम्पिंग ग्राऊंड मध्ये चांगले काम झाले आहे. स्वच्छ अभियान अंतर्गत स्वच्छता स्पर्धा प्रत्येक वर्षी घेण्यात येणार आहे. म्हणून काही काळासाठी काम न करता कायमस्वरूपी काम उभे राहण्यासाठी प्रयत्न के ला पाहिजे. प्रत्येक नगरसेवकाने घेतलेली मेहनत व उपक्रम याची एक स्वतंत्र फाईल बनविण्यात यावी’, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. 
’शहरासाठी जर प्रकल्प प्रस्तावित असतील तर त्यावर तत्काळ निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात यावी. जिल्हा प्रशासनाकडे निधिकरिता प्रस्ताव पाठवावेत. जिल्हा प्रशासन निधी साठी तातडीने मान्यता देईल’ असे आश्‍वासन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले.

आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ’माणुसकीची भिंत’ या उपक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. गरजू व्यक्तींना या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होणार आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. 

वेंगुर्ले कचरा डेपोत घेतले जेवण 
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शनिवारी वेंगुर्ला नगरपरषदेची देखील पाहणी केली. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी चौधरी यांनी चक्क कचरा डेपोत भोजनाचा आस्वाद घेतला.गेल्या 3 वर्षाच्या विकास कामामुळे 12 हजार लोकसंख्या असलेल्या वेंगुर्ले शहराकडे देशाचे लक्ष आहे. शहराच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत मोठ्या प्रमाणात आमूलाग्र विकात्मक बदल झाला आहे. वेंगुर्ले न.प. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक एकत्र येऊन यासाठी जोमाने काम करत आहेत. नगरपरिषदेच्या स्वच्छता मोहीम आणि इतर विकासात्मक उपक्रमाकडे राज्याबरोबरच पूर्ण देशाचे लक्ष आहे. नगरपरषदेचे विविध उपक्रम, स्वच्छता उपक्रम, प्रशासकीय कामाची पाहणी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केली आणि त्यानी मार्गदर्शन सुद्धा केल. या कचरा डेपोत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी भोजनाचा आस्वाद सुद्धा घेतला.