Breaking News

हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा प्रारंभ


नेवासा/ शहर प्रतिनिधी/- श्री गणेश जयंतीनिमित्त नेवासा येथील पावन गणपती मंदिरात हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा प्रारंभ महंत सुनीलगिरी महाराज यांचे हस्ते ध्वजापूजनाने करण्यात आला.या प्रसंगी ह.भ.प.विजय महाराज पवार प्रा.अशोक शिंदे , एस.एन.वाखुरे , अँड.के.एच.वाखुरे, शंकर लोखंडे, नारायण लष्करे, दिलीप फटांगरे, दादासाहेब बर्वे, भाऊसाहेब नवले , सुधीर वाघ, गोरक्षनाथ गजे, रत्नाकर पागिरे, काशीनाथ जमधडे, सांगळे गुरुजी आदी हजर होते.
सप्ताह काळा मृणालिनी मुळॆ, अमृतानंद महाराज कांकरिया , प्रा.अशोक शिंदे, महंत सुनीलगिरीजी महाराज, महंत गोपालनंदगिरीजी महाराज, विष्णुदास महाराज सांगळे, यांचे दुपारी ३ ते ५ या वेळेत प्रवचने ठेवलेली आहेत. तर रात्री ७ ते ९ या वेळेत संगीत विशारद अमोल महाराज बडाख, काशिकानंद महाराज, दत्तात्रय महाराज डिके, बाळकृष्ण महाराज दिघे, अशोक महाराज कोंगे, शिवशाहीर कल्याण काळे,शुभम महाराज कांडेकर यांची श्रवणीय कीर्तन होणार आहेत. 

गणेश जयंती, रविवार २१ जानेवारीला आहे. त्या दिवशी सकाळी १०ते १२ या वेळेत ह.भ.प.उद्धव महाराज चन्ने यांचे कीर्तन होणार आहे. सालाबादप्रमाणे प्रा.अजय पाटील यांची संध्याकाळी पंगत आहे, तर २२ तारखेला व्यासपीठ चालक विजय महाराज पवार यांचे काल्याचे कीर्तन होईल. रवींद्र ओस्तवाल यांच्यातर्फे महाप्रसाद दिला जाणार आहे, तर रोज सुभाष ढोकने, बाळासाहेब कडू, माजी पोलीस कर्मचारी शिंदे , लष्करे वस्ती मंडळ , नाथनगर मित्रमंडळ, दीपक सूइंग मशीन यांच्यातर्फे दुपार, संध्याकाळी पंगत देण्यात येणार आहे. माजी प्राचार्य आर.के.आगळे हे सप्ताह काळात नाश्ता देणार आहेत. सप्ताहाची सांगता मिरवणुकीने होणार आहे.गणेश भक्त परिवार व महिला भजनी मंडळ सप्ताह यशस्वी होण्याकरिता प्रयत्न करीत आहे.