Breaking News

टॅटू असल्यास वायूसेनेत नोकरी नाहीच


नवी दिल्ली : शरीरावर टॅटू काढणार्‍या व्यक्तींना भारतीय वायूसेनेत भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार नाही. खांद्यावर कायमस्वरूपी टॅटू काढल्यामुळे वायूसेना अधिकार्‍याची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय दिल्ली उच्चन्यायालयाने कायम ठेवला आहे. वायूसेनेत भरती होणार्‍या व्यक्तींना विशिष्ट टॅटू काढण्याची मुभा आहे. आदिवासी बांधवांच्या रीतीभाती किंवा परंपरेत बसणार्‍या टॅटूंनाच वायूसेनेत परवानगी आहे. मात्र संबंधित उमेदवाराने गोंदवलेला टॅटू या निकषात बसत नसल्याचे जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस रेखा पाटील यांनी सांगितले. वायूसेनेच्या जाहिरातीत याबाबत स्पष्ट निर्देश दिल्याचे कोर्टाने नमूद केले. कोर्टात अर्ज करताना संबंधित उमेदवाराने टॅटूचा फोटोही जमा केला नसल्याचे कोर्टाने सांगितले.