सत्यता पडताळून कार्यवाही करू - कलीम राजे
बालमटाकळी/प्रतिनिधी :- अपघाताने जबर जखमी होऊन दवाखान्यात मरण पावलेल्या कैकाडी समाजाच्या इसमाच्या घरच्या लोकांनी मरण पावलेल्या इसमास इतरांनी डोक्यात हतोड़ा घालून मारले असल्याचा कांगावा केल्यामुळे नागरिक संतापले. त्याची सत्यता पडताळूनच कायदा हातात घेऊ, खोट्या गुन्ह्यात कोणालाही गोवनार नसल्याचे शेवगावचे पोलीस उपनिरीक्षक कलीम राजे यांनी म्हटले. बालमटाकळी येथील कैकाडी समाजाच्या संघटनेमुळे गावातील निष्पाप लोकांवर गुन्हे दाखल होत असल्याच्या कारणामुळे संतप्त गावकर्यांनी आपआपले व्यवहार बंद ठेऊन गाव बंद आंदोलन केले.
4 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजन्याच्या दरम्यान कैकाडी समाजाचा इसम हा मोटार सायकल वरुन गावातुन जात असता, अचानक रस्त्यावरुन कचरू वाघुंबरे सायकल वर जात असताना त्यांना मोटर सायकलची जबर धड़क बसून दोघेही रस्त्यात पडले, परंतु कैकाडी समाजाच्या इसमाच्या डोक्याला जबर मार लागला होता. हा आपघात श्री. बलंबिका देवीच्या यात्रेमध्ये बारवकर यांच्या दुकानाजवळच झाला असल्याने जवळच असलेल्या नागरिकांनी दोघांनाही 108 या अॅम्बुलंसमधून शेवगावला पाठविले होते. तर गावचे उपसरपंच तथा भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तुषार वैद्य यांनीच 108 नंबर वर फोन करून अॅम्बुलंस बोलाऊन जखमींना शेवगाव येथे दवाखान्यात पाठवले होते. त्यानंतर इसमास नगरच्या सीटी केअर हॉस्पिटलमध्ये 4 ते 5 दिवसांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. हे प्रत्यक्ष दर्शनी असणार्या गावकर्यांनी पाहिले होते, परंतु कैकाडी समाज संघटनेच्या लोकांनी या घटनेचा अपघात नसुन कैकाडी समाजाच्या इसमाच्या घातपात केला असल्याचा बनाव रचुन गावातील लोकावर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसावर संघटनेच्या माध्यमातुन दबाव टाकून गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे येवून बालमटाकळी येथील गावकर्यांनी या विरोधासाठी बालमटाकळी बंद ठेऊन निषेध व्यक्त केला. पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता घटनची सत्यता पडताळावी अशी मागणी गावकर्यांनी केली, यावेळी उपसरपंच तुषार वैद्य, सेवा संथेचे अध्यक्ष रमानाथ राजपुरे, चंद्रकांत गरड, मधुकर पाटेकर, कमुभाई शेख, शेषराव वंजारी, रमेश शिंदे, कैकाडी समाजाच्या लोकांनी मुरमी येथेही इतर सामाजावर अन्याय केल्याने तेथील पीड़ित लोक उपस्थित होते, तर बोधेगाव आउटपोस्टचे पोलीस अधिकारी बोरुडे, गुप्तवार्ता विभागाचे पोलीस चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल एकशिंगेसह गावातील नागरिक उपस्थित होते.