Breaking News

पारनेर पब्लीक स्कूलमध्ये पुस्तकांचे वाटप


पारनेर / प्रतिनिधी ;- आत्मविकासासाठी पुस्तकांशिवाय पर्याय नाही, चांगले विचारांतून भावी पिढी घडते, या उद्देशाने व्यावसायिक संजय चौधरी यांनी शहरातील पारनेर पब्लीक स्कूलमधील विद्यार्थ्यांना तेजज्ञान फाऊंडेशनच्या 1100 पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. आधुनिक काळातील विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्यांची ओळख व्हावी. वैचारीक पातळी वाढून सामाजिक विकास व्हावा, आत्मविकासात पुस्तके महत्वाची आहेत. तेजज्ञान फाऊंडेशनचे आरोग्य, शिक्षण याविषयीचे पुस्तके गाजलेली आहे. पारनेर पब्लीक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विचारविनिमयाचा आधार, आशा आणि विश्‍वास यांसह विविध पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य गिताराम म्हस्के, सोपान चौधरी, सखाराम थोरात आदी उपस्थित होते. संजय चौधरी यांनी राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.