सुजाण नागरिक घडविण्यात ग्रंथालयांचे मोठे योगदान - अॅड. देशमुख
ग्रंथालय चळवळीला भविष्यात महत्व प्राप्त होणार आहे. सुशिक्षीत आणि साक्षर होऊन चालणार नाही, तर मनुष्य सुजाण आणि सुसंस्कृत झाला पाहिजे. असे सुजाण नागरिक घडविण्यात ग्रंथालयांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन नेवासा तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अॅड. देसाई देशमुख यांनी केले.
नगर जिल्ह्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष मुंढे यांची औरंगाबाद येथे बदली झाल्याबद्दल आयोजित भेंडा येथे नेवासा तालुका ग्रंथालय संघाचे वतीने आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमात अॅड. देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर कारखाण्याचे उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग होते. व्यासपीठावर कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, मेजर कल्याण कवार, युवराज मुंढे उपस्थित होते.
