ग्रामदैवत श्री मोहिनीराज महाराज यात्रा महोत्सवास प्रारंभ
नेवासा/शहर प्रतिनिधी/- येथील ग्रामदैवत श्री मोहिनीराज महाराज यांच्या यात्रा महोत्सवास बुधवारपासून श्रीमद भागवत कथेने उत्साहात प्रारंभ होत आहे.श्री मोहिनीराज मंदिर प्रांगणात बुधवार दि.२४ जानेवारीपासून भागवत कथेस प्रारंभ होत असून नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील शंतनू महाराज लोहणेरकर हे भागवत कथा सांगणार आहे.सकाळी संहिता व दुपारी भागवत कथेचे निरूपण मंदिर प्रांगणात होणार आहे.
बुधवार दि ३१ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता वडाळा महादेव येथील रेणुका मंदिराचे प्रमुख देवी भक्त महंत रेवणनाथ महाराज हे देवीचा भळंद संबळाच्या निनादात सादर करणार आहे. गुरुवार दि. १ फेब्रुवारी रोजी पहाटे उत्सवमूर्तीची तहसीलदार यांच्या हस्ते पूजा व दुपारी १ वाजता उत्सवमूर्तीचे येथील प्रवरातिरी असलेल्या मोहिनीराज मंगल कार्यालयाकडे वाजत गाजत शोभायात्रा निघणार आहे. या ठिकाणी पाच दिवस महाप्रसादाचे आयोजन प्रथा परंपरेनुसार होणार आहे.
याच कालावधीत सलग चार दिवस भजन व संगीताचे कार्यक्रम होणार आहे.श्री मोहिनीराज मंदिराच्या प्रांगणात मुंबई येथील युगंधरा वीरकर यांचे रात्री कीर्तन होणार आहे. सोमवार दि ५ फेब्रुवारी रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून येथील श्री मोहिनीराज मंगल कार्यालयामध्ये दुपारी महाप्रसाद व नंतर उत्सव मूर्तींचे श्री मोहिनीराज मंदिराकडे पालखीद्वारे वाजत गाजत मिरवणूक निघणार आहे. सायंकाळी यात्रेचा गोपाळकाला होणार आहे. त्याच दिवशी रात्री १० नंतर उत्सवमूर्तीची शहरातून मिरवणूक निघणार आहे.
दि.६ फेब्रुवारी रोजी कुस्त्यांच्या जंगी हंगामाने यात्रोत्सवाची सांगता होणार असल्याचे यात्रा कमिटी व मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान यात्रेसाठी विविध राज्यातून भाविक यात्रा काळात भेट देतात.यात्रा कालावधीत विविध मंडळ, ग्रामस्थ मंदिरावर वाजत गाजत झेंडा लावतात. मंदिरातील मूर्ती अर्धनारीनटेश्वरची असल्याने देशात हे एकमेव मंदिर आहे.