ऊसउत्पादक शेतकऱ्यांचा थोरात कारखान्यावर मोर्चा पहिली उचल २ हजार ५५० देण्याची मागणी
संगमनेर/प्रतिनिधी ;- कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह परराज्यातील सहकारी साखर कारखाने ऊसाला ३ हजार ५०० रूपये भाव देवून ३ हजार १०० रूपयांची उचल शेतकऱ्यांना दिली आहे. मात्र, सहकारमहर्षि स्व. भाऊसाहेब थोरात कारखान्याने शेतकऱ्यांना २ हजार ३०० रूपये उचल दिली आहे. ही उचल २ हजार ५५० रुपये देण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकण्याचे मंगळवारी आंदोलन पुकारले. या दरम्यान कारखान्याच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आंदोलनकर्त्यांनी प्रारंभी सहकारमहर्षि स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. संचालक मंडळापुढे मागण्या सविस्तरपणे मांडणार असल्याचे सांगण्यात आले. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, साहेबराव नवले, बापुसाहेब गुळवे, शरद थोरात, भास्कर दिघे, वसंत देशमुख, साहेबराव वलवे, रावसाहेब डुबे, काशिनाथ पावसे, अॅड. दिलीप साळगट, जर्नादन आहेर, कैलास वाकचौरे, अशोक सातपुते, डॉ. अरूण इथापे, डॉ. अशोक इथापे, संजय फड, पप्पू कानकाटे, दिपक वाळे, संतोष रोहोम आदीसंह तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आंदोलनाचे गांभीर्य ओळखून आंदोलकांना कारखान्यात प्रवेश नाकारण्यात आला. यावेळी आमरण उपोषण करण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेत ऊसाच्या गाड्या अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. यावेळी साखर आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी राजेंद्र देशमुख यांनी साखर उत्पादक व कारखाना व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधून यातील मार्ग काढण्याचे आश्वासन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात यांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्यांना संगमनेर शहर पोलिस ठाण्यात आणत कायदेशीर प्रकिया पूर्ण करत सोडून देण्यात आले.