Breaking News

जिल्हास्तरीय गणित प्राविण्य परीक्षेत ज्ञानोदय विद्यालयाचे यश.


नेवासा/शहर प्रतिनिधी/-महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ व जिल्हा गणित अध्यापक मंडळ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने १० डिसेंबर २०१७ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेत नेवासा येथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूलमधील इयत्ता पाचवी व आठवीचे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.या परीक्षेत विद्यालयाच्या विदयार्थ्यांनी सुयश संपादन केले असून पाचवीच्या व आठवीच्या प्रत्येकी दोन - दोन विद्यार्थ्यांची जिल्हा प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झाली आहे.
वरद गुरूप्रसाद देशपांडे, गुरूप्रसाद सुनिलनवले , तन्मय राजू आडे व सुमित रामदास पवार ,वैभव अनिल शिंदे या ज्ञानोदय इंग्लिश स्कूलच्या विदयार्थीची जिल्हास्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांची पुढील परीक्षा रविवार दिनांक ४ फेब्रुवारी २०१८ रोजी अहमदनगर येथील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल येथे होणार आहे.

या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे गणित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक राजेंद्र सोनवणे यांनी मार्गदर्शन केले या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माधवराव मुळे , सचिव जी.डी.खानदेशे , विश्वस्त मोहनराव हापसे, अलका जंगले तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक , उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांनी अभिनंदन केले आहे.