कणकवली शिवसेना उपशहर प्रमुखांच्या गाड्यांची तोडफोड
सिंधुदुर्गनगरी, - कणकवली शिवसेना उपशहर प्रमुख प्रमोद मसुरकर यांच्या दोन गाडीची मध्यरात्री अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली.यामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. आज शुक्रवारी सकाळी मसुरकर यांनी या घटनेची फिर्याद कणकवली पोलीस स्थानकात दिली.
प्रमोद मसुरकर यांनी आपल्या गाड्या पमाज सिटी सेन्टरच्या पार्किंगमध्ये नेहमी प्रमाणे लावून ठेवल्या होत्या. आज सकाळी बलेरो आणि फोल्क्सवॅगन या दोन्ही गाड्यांचे दर्शनी भागाच्या काचा फोडलेल्या दिसून आल्या. चिरा आणि दगडाच्या सहाय्य्यने तोडफोड केल्यान गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. कचरा टेंडर संदर्भात कालच झालेल्या पत्रकार प रिषदेचे हे पडसाद असल्याच उपशहर प्रमुख प्रमोद मसुरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान या भ्याड हल्ल्याची शिवसेनेने गंभीर दखल घेत शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, तालुकाप्रमुख सचिन सावंत, कणकवली विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश भोगले यांनी प्रमोद मसुरकर यांच्या निवासस्थानी जाऊन घटनेची पाहणी केली.