लोकलच्या धडकेने घोड्याचा मृत्यू; म.रे विस्कळीत
ठाणे - वांगणी-बदलापूर स्थानका दरम्यान लोकलची धडक लागून घोड्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. यामुळे मध्य रेल्वेची अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे गाड्या तब्बल अर्धा तास उशिराने धावत आहे. ऐन गर्दीच्या वेळीच प्रवाशांचे हाल होत आहेत. गाड्या उशिराने धावत असल्यामुळे अप मार्गावरील गाड्यांना प्रचंड गर्दी होती. वांगणी-बदलापूर स्थानका दरम्यान सकाळच्यावेळी घोडा अचानक रेल्वे समोर आला. यावेळी त्याला रेल्वेची धडक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.