पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाबळेश्वरमध्ये शिवशाही बस सुरू
सातारा - पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर बस आगारात दोन शिवशाही बस दाखल झाल्या आहेत. आज या बसचा आरंभ सातारा विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर, आगार व्यवस्थापक विक्रम देशमुख, अफजल सुतार, रवींद्र कुंभार दरे, गोपाळ वागदरे व मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथे महाबळेश्वर येथून पहिली शिवशाही बसचे आगमन झाले.
देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण केंद्र म्हणून पाचगणी-महाबळेश्वर या ठिकाणी मोठी गर्दी होते. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली जाते. काही लोक हे पुणे, नाशिक, ठाणे व मुंबई आणि परराज्यातून स्वतःच्या वाहनाने पाचगणी, महाबळेश्वर या ठिकाणी फिरायला येतात. त्यांच्या वाहनांना पार्किंग साठी जागा उपलब्ध होत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे मंत्री दिवाकर रावते, वरिष्ठ अधिकारी यांनी महाबळेश्वर बस आगारासाठी दोन शिवशाही बस दिल्या आहेत.
आणखी दोन शिवशाही बस दाखल करण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यातील शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, हर्षल कदम व शिवसेना माजी जिल्हा प्रमुख हणमंतराव चवरे यांनी त्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला होता. त्याला खर्या अर्थाने यश मिळाले आहे अशी भावना पर्यटक व स्थानिक पातळीवर शिव सैनिक व्यक्त करीत आहेत. आज सकाळी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मूर्तीदिननिमित्त शिवशाही बसचा महाबळेश्वर-पुणे हा पहिला बस प्रवास सुरू झालाआहे. या बस प्रवासाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती