Breaking News

जळगाव शहरासह जिल्ह्यात गुटख्याची खुलेआम विक्री

जळगाव, दि. 07, जानेवारी - जळगाव शहरासह जिल्ह्यात गुजरात व मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची व सुगंधीत सुपारी व तंबाखूची आवक मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे खुलेआम टपर्‍यांमधून या बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे चित्र दिसून येत आहे . मात्र शासनाने यावर बंदी आणलेली असताना अन्न औषध व पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्यानेच मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा व्यापार बोकाळलेला दिसत आहे .


कारवाईचा धाक नसल्याने विक्रेते खुलेआम विक्री करीत असल्याने विशेषतः शालेय विद्यार्थी गुटख्याचे व्यसनाधीन बनत आहे .शहरातील गोलाणी मार्केट ,फुले मार्केट , नवे - जुने बस्थानक ,रेल्वे स्टेशन , यासह इतर नगर उपनगरांमधील किराणा दुकान चहा पण टपरीमधून विमल गुटख्यासह मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे . दरम्यान असतानाही संबंधित विभाग याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप सामान्य जनतेकडून होत असून यात मोठ्याप्रमाणावर अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याने कारवाई नावालाच केली जात असल्याचे बोलले जात आहे .