Breaking News

स्व. डावखरे यांच्या अस्थींचे सोमवारी रामकुंडात विसर्जन


नाशिक, दि. 07, जानेवारी - विधानपरिषदेचे माजी उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व.वसंत डावखरे यांच्या अस्थिंचे विसर्जन सोमवार दि.8 जानेवारी रोजी रामकुं डात विसर्जन करण्यात येणार आहे.
स्व. डावखरे यांचे 4 जानेवारी रोजी निधन झाले. शुक्रवार 5 जानेवारी रोजी त्यांच्यावर ठाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवार 8 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या अस्थिंचे पंचवटी येथे रामकुंडात विसर्जन करण्यात येणार आहे. त्यांचा मुलगा प्रबोध व आ. निरंजन तसेच कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते त्यांच्या अस्थिंचे विसर्जन केले जाईल. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी तसेच डावखरे यांचे चाहते उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.