गोविंद गायकवाड समाधी तोडफोड प्रकरणी 7 जणांना जामीन मंजूर
समाधी तोडफोड प्रकरणी सुषमा ओव्हाळ यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र दोन्ही बाजूकडील लोकांमध्ये समेट घडवून आणल्याने तक्रार मागे घेण्यात आली. दरम्यान सदर समाधी पुन्हा बांधण्याचाही निर्णय घेण्यात आला. ओव्हाळ यांनी तक्रार मागे घेत असल्याचे न्यायालयासमोर सांगितले. त्यानंतर उपरोक्त 7 जणांना जामीन मंजूर करण्यात आला.