Breaking News

दुरगाव तलावाच्या भिंतीकडे दुर्लक्ष; भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल.


कर्जत- कुळधरण या मुख्य रस्त्यावर असणा-या या तलावाला दुरगाव तलाव म्हणुन सर्वञ परीचीत आहे. या तलावात उन्हाळ्यात कुकडी धरणाचे पाणी सोडले जाते. तलावातुन कर्जत व जामखेड तालुक्यातील टंचाई गावाना पिण्याचे पाणी पुरविले जाते. हा तलाव संजीवनी ठरलेला आसतानाही देखभालीकडे माञ दुर्लक्ष होत असुन, भविष्यात मोठी किंमत कर्जत तालुक्याला मोजावी लागेल.

दुरगाव तलावाच्या (पाळू ) भराव भिंतीवर झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने तलावाची भिंत पोखरली जात आहे. भविष्यात त्यामुळे दुरगाव, थोटेवाडी या गावासह हजारो एकर क्षेञाला धोका निर्माण होण्याची भिती दुरगाव येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तलावाच्या भराव भिंतीवरूनच पुर्वी सायकल, मोटार सायकल, टँक्टर, बैलगाडी सहज ने -आण करीत असत. आता माञ मोटार सायकली चालवणे देखील आवघड झाले आहे. तर मोठी वाहने चालवणे शक्य नाही.

गेल्या पाच वर्षापासुन पावसाचे प्रमाण कमी राहील्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तलावात पाण्याचा साठा अत्यंत कमी प्रमाणात असायचा पण टंचाई काळात कुकडी कँनलचे पाणी या तलावात सोडल्याने या परिसरातील नागरीकांचे पाण्यावाचून हाल सरकारने वाचविले. एवढेच नव्हे तर कर्जत जामखेड तालुक्यातील अनेक गावाची तहानही या तलावावरूनच भागलेली आहे. असा हा दुरगाव तलाव अत्यंत महत्वाचा असुनही याकडे प्रशासन व लोकप्रतीनिधी दुर्लक्ष करतात हे माञ दुर्दैवी आहे .

यावर्षी अत्यंत चांगला पाऊस झाल्याने तलाव हा क्षमतेपेक्षा जास्त भरला आहे. तलावाच्या पाळू वरील वाढलेली झाडे, झुडपे आणि पाण्यामुळे अत्यंत भितीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळपास सात वर्षापासुन झाडे, झुडपे न तोडल्यामुळे येथील झाडांचा खोडांचा आकार रूदांवला आहे. झाडांची मुळे पाळू कमजोर करीत असल्याने धोका वाढला आहे. एवढेच नव्हे तर ये- जा करण्यासाठी पाळूचाच रस्ता वापर करतात. त्यामुळे पाटबंधारे ( कुष्णा खोरे महामंडळ ) विभागाने तात्काळ येथील झाडे- झुडपे काढून टाकावीत अ शी मागणी स्थानीक नागरीक करत आहे.

हा तलाव पाटबंधारे कडून कुष्णा खोरे महामंडळाकडे हस्तातंरण होवून दहा वर्ष झाली आहेत. या विभागाचे शाखा कार्यालय कुळधरण येथे असुन उपविभाग राशीनला तर कार्यकारी अभियंता कार्यालय श्रीगोंदा येथे आहे. या तिन्ही कार्यालयाचे माञ या तलावाकडे दुर्लक्ष होत असल्याने भिती निर्माण झालेली आहे. तलावाच्या भिंतीवर झाडांची वाढ जास्त झालेली आहे लवकारात लवकर धोकादायक झाडांची छाटणी करण्याची गरज असुनही या गंभीर घटनेकडे शाखा अभियंता आनारसे, उप अभियंता साठे व कार्यकारी अभियंता कोळी व लोकप्रतिनिधी यांचे माञ दुर्लक्ष होत आहे.