आठव्या ’’उगवाई’’ काव्योत्सव अध्यक्षपदी मनोहर सोनवणे
सिंधुदुर्गनगरी, कविवर्य वसंत सावंत, स्मृतीप्रित्यार्थ कणकवली येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणार्या आठव्या उगवाई काव्योत्सवाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी आणि संपादक मनोहर सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. 20 जानेवारी सायंकाळी 5 वाजता शहरातील अप्पासाहेब पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या काव्योत्सवाचे उद्घाटन मराठी साहित्याचे तरूण अभ्यासक महेंद्र मुंजाळ यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आवाणओल प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी अजंय कांडर यांनी दिली
उगवाई काव्योत्सव दोन सत्रात आयोजित करण्यात येतो. पहिल्या सत्रात कविवर्य वसंत सावंत, काव्यपुरस्कार ठाणे येथील कवी सुशीलकुमार शिंदे यांना त्यांच्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या काव्यसंग्रहासाठी तर याचवेळी पैठण, औरंगाबाद येथील कवी संदीप जगदाळे यांना कविवर्य द.भा. धामणस्कर पुरस्कार प्रधान करण्यात येणार आहे.दुसर्या सत्रात विशाखा पुरस्कार प्राप्त कवी अरूण नाईक यांच्या अध्यक्षतेखाली खुले कवीसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात जुने नवे कवी आपल्या कविता सादर क रतील. तरी महाराष्ट्रातील कवींनी या काव्योत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.