Breaking News

न्यायालयाच्या आवारात कुख्यात गुंड इम्रान मेहंदीवर दगडफेक


औरंगाबाद  दि. 31, जानेवारी - खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड इम्रान मेहंदी याच्यावर कुरेशी टोळीतील गुंडांनी जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात दगडफेक केली. या दगडफेकीमुळे कुरेशी आणि मेहंदी गटात हाणामारी झाली. एका खुनाच्या गुन्ह्यात इम्रान मेहंदी याला तीन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली असून सध्या त्याला हर्सूल कारागृहातील अंडासेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी इम्रान मेहंदीला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.