Breaking News

शरद पवार- राजू शेट्टी आघाडीबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता


पुणे, दि. 31, जानेवारी - राजकीय जीवनात बदल होत असतात. अशा वेळी प्रत्येकजण आपल्याला योग्य वाटेल ते करत असतो, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट ्रवादीचे नेते अजित पवार यांनी खा. शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्या एकत्र येण्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आगामी काळात पवार-शेट्टी आघाडीबाबत सक ारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शारदानगर येथील शैक्षणिक संकुलात जिल्हा परिषदेच्या वतीने यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. यानंतर आ. पवार यांना पत्रकारांनी शरद पवार व राजू शेट्टी यांच्या एकत्रित संविधान बचाव मोर्चाबाबत विचारणा केली. त्यावर बोलताना पवार म्हणाले, राजकीय जीवनात बदल होतच असतात. अशा काळात जो-तो आपल्याला योग्य वाटणारा निर्णय घेऊन त्यानुसार वाटचाल करत असतो. 

आ. अजित पवार यांनी याबाबत जास्त बोलणे टाळले असले तरी आगामी काळात सर्व भाजप विरोधकांची एकत्रित मोट बांधण्याच्या हालचालीबाबत ते सकारात्मक असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे येणा-या काळात पवार-शेट्टी यांच्यासह अनेक विरोधक एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.