Breaking News

गांजा पार्टीने सावंतवाडीत खळबळ


सिंधुदुर्गनगरी, दि. 18, जानेवारी - सावंतवाडीत भरवस्तीत गांजा पार्टी सुरू असताना या जिल्यातील पोलीस यंत्रणा नेमकी काय करतेय? असा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नागरिकांना ही पार्टी बंद पडण्याची आली वेळ तरी पोलीस यंत्रणा तपासच करत आहे. मात्र हा गांजा माफिया अजून सापडला नाही, अशी टीका सावंतवाडीच्या महिला नगरसेविक ांनी पत्रकार परीशादेत केली. पोलिसांच्या तपासावर त्यानी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल आहे.
सावंतवाडी सारख्या संस्थानकालीन नगरीला गांजा ड्रग्सची नशा कोण लावतो? तरुण पिढी बिघडण्यास कोण कारणीभूत, याचा तपास व्हावा, यासाठी सावंतवाडीतील नागरिक एक वटणार आहेत. या तरुण मुलांना हे एवढ डेरिंग आलं कुठून? याची चौकशी होणे गरजेचे आहे. या शहरात बिनधास्तपणे कोण गांजा व ड्रग्ज पुरवतोय याची पोलिसांनी चौकशी क रावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जर याचा तपास चार दिवसात पोलिसांनी लावला नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा सावंतवाडी नगरपालीकेच्या नगरसेविका तथा ज्येष्ठ शिवेसना कार्यकर्त्या अनारोजिनी लोबो यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत दिला.