मालवण मच्छीमारांचे हल्लाबोल आंदोलन
सिंधुदुर्गनगरी, दि. 18, जानेवारी - अनधिकृत पर्ससीन मासेमारी विरोधात संतप्त मच्छीमारांनी ’हल्ला बोल’ आंदोलन पुकारले आहे. प्रखर विद्युत झोतातील बंदी असलेली मासेमारी तसेच अनधिकृत पर्ससीन मासेमारीमुळे मत्स्य दुष्काळ. पडला आहे. मासेमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरीसुद्धा मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून कारवाई होत नसल्याने मच्छिमार आक्रमक झाले आहे. त्यामुळे दांडी आवार मालवण येथे जमलेल्या मच्छिमारांनी ’हल्ला बोल’ आंदोलनाचा पवित्रा घेतला. पर्ससीन व प्रखर दिव्यांच्या प्रकाश झोतातील पर्ससीन मासेमारी विरोधात मच्छिमार एकवटले आहेत. प्रखर दिव्यांच्या प्रकाश झोतातील पर्ससीन मासेमारीला बंदी असतानाही सिंधुदुर्गातील समुद्रात या प्रकारची मासेमारी होत आहे. शासनाच्या संबंधित यंत्रणा सुस्तावल्या असून याचा फटका मच्छिमारांना बसला आहे.
समुद्रातून मासळी मिळत नसल्यामुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथील बंदरांमध्ये राजरोसपणे पर्ससीनच्या सहाय्याने पकडलेली इच्छी उतरली जात आहे. मात्र गुरुवार पासून अशी मच्छी कोणत्याही बंदरात उतरण्यास विरोध केला जाणार आहे. तसेच मत्स्य खात्याने तत्काळ कारवाईस सुरुवात न केल्यास स्वतः मच्छिमार समुद्रात जाऊन अशा अनधिकृत मासेमारी करीत असलेल्या नौका पकडून आणून मत्स्य खात्याच्या स्वाधीन करणार असल्याचा इशारा दांडी आवार येथे मच्छीमारांच्या बैठकीनंतर संतप्त मच्छीमारांनी दिला आहे. ज्या प्रमाणे अनधिकृत वाळू उत्खनन कारवाईच्या वेळी प्रशासनाकडून यातील होडी ज्या प्रमाणे फोडून टाकली जाते त्या प्रमाणे पकडण्यात आलेली नौका अधिकार्यांनी फोडून टाकल्यास त्यांना 5 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करीत असल्याची घोषणा विकी तोरसकर यांनी केली. स्थानिक प्रशासनावर आमचा विश्वास राहिला नसून 26 वाव पुढील खोल समुद्रातील अनधिकृत मासेमारीवर कोस्ट गार्ड ने तरी कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनवणी या मच्छीमारांनी कोस्ट गार्डला केली आहे. या बैठकीत मच्छिमारांसह विकी तोरसकर, बाबा परब, बाबी जोगी हे सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. हे आंदोलन पूर्वीसारखे पारंपरिक मच्छिमार विरुद्ध पर्ससीन असे नसून या आंदोलनात ट्रॉलर, बलॅव, पात, रापण याप्रकारची मासेमारी करणारे मच्छिमार सामील आहेत तसेच हे आंदोलन कोणत्या एका राजकीय पक्षाच्या वतीने नसून या आंदोलनात सर्व पक्षीय सामील असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.