किर्लोस येथे शेतकरी कृषी मेळावा संपन्न
सिंधुदुर्गनगरी, दि. 18, जानेवारी - श्री रामेश्वर शेतकरी समूह गट किर्लोस, कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग-किर्लोस आणि ग्रामपंचायत किर्लोस यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान कें द्र सिंधुदुर्ग किर्लोस इथ शेतकरी कृषी मेळावा संपन्न झाला. या कृषी मेळाव्याला शेतकर्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या शेतकरी कृषी मेळाव्याच उद्घाटन वायरी देवबाग जि.प. मतदार संघाचे जि.प. सदस्य हरी खोबरेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाल. यावेळी किर्लोस सरपंच तथा कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग किर्लोसचे संस्थाचालक प्रदीप सावंत, प्रगतशील शेतकरी बाबा सावंत, माजी सरपंच बंडू चव्हाण, कृषी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मंदार गीते, किर्लोस उपसरपंच दीपक किर्लोस्कर, गोठणे सरपंच सौ. चव्हाण, असगणी सुमित्रा कासले, बंडू कासले, सुभाष धुरी, अॅग्रो साप्ताहिकाचे पत्रकार श्री चौगुले, कृषीविस्तार तज्ञ विलास सावंत, विलास धामापूरकर, बाळकृष्ण गावडे, विवेक सावंत तसच कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे कृषी तज्ञ उपस्थित होते. या कृषी तज्ञांनी या मेळाव्यात भात, भुईमुग, काजू प्रक्रिया, पपई यासह विविध विषयावर मार्गदर्शन केल. तसच जी.प. सदस्य हरी खोबरेकर आणि डॉ. मंदार गीते यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.