Breaking News

लोकशिक्षणाचा पाया मजबूत करावा : कोल्हे


कोेपरगांव : प्रतिनिधी :- नारीशक्तीला सर्वत्र मान आहे. मकरसंक्रात पर्वावर वाण लुटण्यांचे महत्व आहे. तेंव्हा महिलांनी आपल्यातील चांगल्या गुणांचे वाण समाजातील अन्य घटकांना देऊन त्यातून लोकशिक्षणाचा पाया मजबूत करावा, असे आवाहन आ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.
कोपरगांव शहर व तालुक्यातील महिला भगिनींचा हळदीकुंकू समारंभ लक्ष्मीनगर येथे नुकताच पार पडला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी माजी नगरसेविका शिल्पा रोहमारे यांनी प्रास्तविक केले. नगरसेविका विद्या सोनवणे यांनी नगरपालिका व आ. कोल्हे यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली. हर्शा कांबळे, मंगल आढाव, मोनिका पराग, आदींसह सर्वच नगरसेविका भाजपा महिला पदाधिकारी आणि लक्ष्मीनगर पंचक्रोषीतील महिला यावेळी उपस्थित होत्या.