Breaking News

मुलाखतीमधील एखादा नकारात्मक शब्द मुलाखत संपवितो : किर्दक


कोपरगांव : प्रतिनिधी :- सध्याच्या परिस्थितीनुसार उद्योग जगताला आधुनिक तंत्रज्ञान अवगत असलेल्या मनुष्यबळाची गरज ही मुलभत बाब आहे. परंतु त्याचबरोबर उद्योग जगत व्यक्तिक्तीमत्वामधील आत्मविश्वासी माणूस बघत असते. शारीरिक, मानसिक क्षमतेबरोबरच नेतृत्व गुणही पारखत असते. काम करण्याची धमक शोधत असते. मुलाखतीमधील एखादा नकारात्मक शब्द मुलाखत संपवित असतो, असे प्रतिपादन औरंगाबादच्या किर्दक कंपनीचे अध्यक्ष सुनिल किर्दक यांनी केले.
संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनीच्या सर्व व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील विध्यार्थ्यांसाठी ‘संजीवनी थाॅट लिडर्स’ ही व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत यशस्वी उद्योजकांना आमंत्रित करण्यात आले. त्यांचच्याकडून विध्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजा, कामातील पध्दती, बदलते तंत्रज्ञान, स्वयंरोजगाराची तयारी आदी बाबींबर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या संकल्पनेनुसार संजीवनी के. बी. पी. पाॅलीटेक्निकच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाने आयोजित केलेल्या संजीवनी थाॅट लिडर्स या व्याख्यानमालेत किर्दक बोलत होते. यावेळी औरंगाबाद येथील प्रसिध्द उद्योजक व संजीवनी पाॅलीटेक्निकचे माजी विद्यार्थी किरण जगताप, प्राचार्य ए. आर. मिरीकर, डाॅ. आर. ए. कापगते, विभाग प्रमुख प्रा. जी. एन. वट्टमवार आदी उपस्थित होते.