अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा २६ गोवंशीय जनावरांसह १००० किलो मांस जप्त.
अहमदनगर :- शहरातील कोठला परिसरातील बापुशहा दर्ग्याच्या पाठीमागे चालणाऱ्या अवैध कत्तलखान्यावर काल सायंकाळी सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे व त्यांच्या टीमने कारवाई करत छापा टाकला. याकारवाईत २६ लहान मोठे जनावरे, १००० किलो मांस. , एक मोटारसायकल,आणि एक टेम्पो असा ९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सहाय्यक पोलीस अधीक्षक यांना कोठला परिसरात अवैध कत्तलखाना चालू असल्याची गुप्त खबर मिळाली. त्यानुसार शिंदे यांनी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, पोहेकॉ गिरवले, पोलीस नायक राजेंद्र सुद्रिक , सचिन जाधव, पोकॉ. ज्ञानेश्वर शिंदे, फसले, माशाळकर, सानप, सरोदे आदींनी मिळून ही कारवाई केली.
सदर प्रकरणी अब्दुलबारी युनूस कुरेशी , तौफिक युनूस कुरेशी , हाजी बिलाल कुरेशी, जेक्रीय इलास कुरेशी, मोबीन मुस्ताक कुरेशी, मोईन मुस्ताक कुरेशी ( सर्व राहणार कोठला, अहमदनगर) यांना ताब्यात घेतले आहे. यांच्याविरुद्ध सन १९९५ चे कलम ५ (क), ९ (अ), सह सन १९६० चे कलम ११ व मो.वा.का. कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.