कृषी उत्पादनांवरील कररचनेत कृषीक्षेत्राचा सहभाग घेण्याची नीती आयोगाचे सदस्य प्रा. रमेश चंद यांची शिफारस
प्रा. चंद यांनी मंत्रालय पत्रकार कक्षामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार गिरीष व्यास उपस्थित होते.प्रा. चंद पुढे म्हणाले की, शेतकरी तसेच ग्राहक या दोन्ही घटकांचे हित लक्षात घेत नीती आयोगाने केंद्र शासनाने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येते. गेल्या काही काळात कृषी उत्पादनांच्या आयात-निर्यातीवर कर वाढवणे किंवा कमी करण्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला चांगला बाजारभाव मिळण्यात मदत झाली आहे.
