आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील ९० सिंचन योजनांसाठी ३५०० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करावी : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
नवी दिल्ली : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी 3500 कोटी तसेच गोंडवाना विद्यापीठासाठी 240 तर सेवाग्राम विकासासाठी 177 कोटींची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आढावा बैठकीत केली.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज विज्ञान भवनात केंद्रीय अर्थसंकल्प (2018-19) पूर्व आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत श्री.मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राच्या विकास योजनांसाठी लागणाऱ्या निधीबाबतची माहिती केंद्रीय अर्थमंत्र्यांसमोर सादर केली. राज्याच्या वतीने श्री.मुनगंटीवार आणि विक्रीकर आयुक्त राजीव जलोटा उपस्थित होते.
या बैठकीत श्री.मुनगंटीवार यांनी राज्यातील विविध विकास प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थ संकल्पात भरीव तरतूद करण्याची मागणी केली. यामध्ये कृषी, सिंचन, शिक्षण, महिला व बालविकास,ऊर्जा, रेल्वे, गृह, पर्यटन, यासह वन आधारित उद्योग, फिनटेक रेग्युलेशन्स, स्टार्टअप धोरणसाठी व नक्षलप्रभावित पायाभूत सुविधा यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी श्री.मुनगंटीवार यांनी आजच्या बैठकीत केली.