Breaking News

बससेवेचा उडाला बोजवारा; एसटी डेपोच्या प्रतीक्षेत कर्जतकर


कर्जत/ सुभाष माळवे/- कर्जतकरांचे एसटी डेपोचे स्वप्न कधी पूर्ण होणार? हा प्रश्न पडलेला असताना, बसस्थानाकावरून धावणाऱ्या लालपरीच्या सेवा तरी चांगल्या मिळाव्यात. एवढीच माफक अपेक्षा सर्वसामान्य नागरिक कर्जत बसस्थानकात व्यक्त करत आहे. याचा दै लोकमंथनने आढावा घेतला. यामध्ये विधार्थी, विद्यार्थीनी, महीला, जेष्ठ नागरीकांशी संवाद साधला. त्यात अनेक अडचणींचा सामना करत प्रवास करावा लागत असल्याचेच सर्वांनी सांगितले. यामुळे एसटीने प्रवास करणारे सर्वजण फारच ञस्त आहेत. असे चित्र पहावयास मिळत असून याकडे शासन गंभीरपणे पाहणार आहे का? असा प्रश्न आहे.
कर्जत या तालुक्याचे ठिकाणी गेली अनेक वर्ष सातत्याने पाठपुरावा करून, आंदोलने करून व अनेक निवडणुकामध्ये डेपोचा प्रश्न निवडणुकीचा मुख्य मुद्दा बनून देखील अद्यापि कर्जतकराना एस टी डेपो हा स्वप्नवतच वाटतच आहे. कर्जत बसस्थानकातून प्रवाशांची वाढती संख्या, बंद पडणा-या बसगाडयां, अनियमित बसचे मोठे प्रमाण, अचानक बस रद्द होण्याचे प्रमाण खूप असणे, एस टी डेपोची कमरता अशा विविध कारणामुळे एस.टी. बससेवेचा पुरता बोजवारा उडत असल्याचे चिञ पहावयास मिळत आहे. प्रवाशाची सुरक्षा देखील वा-यावर आहे.

कर्जत तालुक्याची वाहतूक व्यवस्था पूर्णत: श्रीगोंदा डेपोवर तर काही अंशी जामखेड डेपो वर अवलंबून आहे. मात्र या डेपोच्या बसेस कधीच वेळेवर येत नसल्याची तक्रार नित्याची झाली आहे. बारामती व करमाळा आगाराच्या बस काही प्रमाणात वेळेवर येत असल्याने तोच काय तो येथील प्रवाशांना आधार आहे. कर्जत तालुक्यात एस टी महामंडळाची सेवा रडतखडतच सुरु आहे. तालुक्याअंतर्गत विस्कळीतपणे चालत असलेल्या बससेवेमुळे विधार्थी , व्यापारी, नोकरदार तसेच अप- डाऊन करणारे प्रवाशी व कामासाठी बाहेर पडणा-या सर्व स्तरातील प्रवाशांना नेहमीच पोहचण्यास उशीर होतो. मासीक पास असणा-या विधार्थी, जेष्ठ नागरीक याचे होणारे हाल तर ऐकण्यास ही येथे कोणी वाली उरला नाही अशी परिस्थिती आहे.

कर्जत बसस्थानकावर श्रीगोंदा , जामखेड या आगारा शिवाय बारामती, बीड, करमाळा, आष्टी, दौण्ड आदी आगाराच्या एस.टी.बसेस रोजच जा-ये करत असतात. परंतु श्रीगोंदा व जामखेडच्या अनेक एस.टी.बसला नावाचा फलक नसतो. व या बसमध्ये जागा धरण्यासाठी हातातील पिशवी व इतर आनेक वस्तुचा बसच्या खिडकीतून सीटवर टाकून जागा पकडली जाते. या ठिकाणावरून ठरावीक वेळेसच बस असल्याने प्रवाशाची मोठी गर्दी असते. या गर्दीचा फायदा उचलत चोरटे सतत चोरी करत असतात. आनेक वेळेस चोरी करणारे स्ञी अथवा पुरूष किंवा लहान मुले पकडली जातात. प्रवासी व स्थानीक लोक चांगलाच चोप देतात व पोलीसाच्या ताब्यात देतात. पण पोलीस काहीच कारवाई करताना दिसत नाही. चोराना लगेच सोडून देतात त्यामुळे चोरी होण्याच्या प्रमाणात दिवसेदिवस वाढच होत आहे. या बसस्थानकावर चोराचा पाठलाग करून पकडण्यात आले. पंरतु चोरास पकडूनही मुद्देमाल माञ सापडत नाही. चोराचे साथीदार माल लगेच लंपास करतात. या ठिकाणी कायम पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी आहे. या मागणी साठी रस्ता रोको आंदोलनही झालेले आहे . कर्जतचे पोलीस निरीक्षक वसंत भोये याच्याकडेही अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत, पण उपयोग होताना दिसत नाही.

मागच्या बसने या..

आम्ही कधी कधी दोन तास बसची वाट पाहत असतो. माञ या बसस्थानकावर व तालुक्यातील बऱ्याच बस स्टाँपवर बस थांबत नाही. मागच्या बसने या ' असे ब-याचदा वाहकांकडून सांगीतले जाते. ब-याचदा कर्जत बसस्थानकावर वाट पाहिल्यावर एकदम तीन बस येतात.माञ या तिन्ही बसचे वाहक दुस-या बसमध्ये चढा. ही बस उशिराने जाणार आहे. असे सांगतात. या वागण्याने विदयार्थी याच्यासह प्रवासी यांना मानसिक ञास सहन करावा लागतो. असा विदारक अनुभव नाव न सांगण्याच्या अटीवर महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सांगीतला