Breaking News

धनगर समाज सेवा संस्थेच्या जिल्हाअध्यक्षपदी विजय झडे


राहुरी प्रतिनिधी :- धनगर समाज सेवा संस्था (महाराष्ट्र ) या संस्थेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते विजय झडे यांची नियुक्ती करण्यात आली. धनगर समाज सेवा संस्थेचे प्रदेशाध्यक्ष नवनाथ ढगे यांनी झडे यांची नियुक्ती केली. धनगर समाजाचे संघटन करुन समाजाचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे झडे म्हणाले. यानिवडीबद्दल झडे यांचे प्रदेशाध्यक्ष नवनाथ ढगे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्ताभाऊ चोरमले, जि. प. सदस्य शिवाजी राजे गाडे पा., रा. न. पा. विरोधी पक्ष नेते दादा पा. सोनवणे, रा. स. प. जिल्हाध्यक्ष  शरदराव बाचकर, रा. स. प. युवा जिल्हाध्यक्ष नानाभाऊ जुंधारे, यशवंत सेना जिल्हाध्यक्ष विजय तमनर, संदिप तमनर, अमोल खेडेकर, विनायक शिंदे, संतोष मदने, बाचकर, अशोक तनपुरे, अशोक बोरकर, पत्रकार निसार सय्यद, राहुल कोकरे, नवनाथ खडके, रभाजी बुचुडे आदींनी झडे यांना शुभेच्छा दिल्या.