Breaking News

जलशुध्दीकरण प्रकल्पाचे उदघाटन उत्साहात


कोपरगाव ता. प्रतिनिधी :- तालुक्यातील मंजुर येथील मंजुर हंडेवाडी विविध कार्य. सह. सोसायटीने उभारलेल्या जलशुध्दीकरण प्रकल्पाचे उदघाटन कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सिध्देश्वर देवस्थानचे महंत स्वामी शिवानंदगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रकल्पाद्वारे साधे व थंडगार असे दोन्ही प्रकारचे शुध्द पाणी २४ तास जनतेसाठी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ए.टी.एम. ची सुविधाही उपलब्ध आहे. प्रकल्प उदघाटनप्रसंगी सहाय्यक निबंधक आर. एल. त्रिभुवन, के. ए. गवळी, संस्थेचे अध्यक्ष रामनाथ भोसले, उपाध्यक्ष कृष्णराव कापसे, भास्करराव तिरसे, संभाजीराव गावंड, बबनराव घुमरे, साहेबराव तिरसे आदींसह ग्रामस्थ, सभासद उपस्थित होते.