Breaking News

अखेर त्या निराधार आजोबांना मिळाला कायमचा निवारा! वारीच्या ग्रामस्थांचा अनोखा आदर्श


कोपरगाव : प्रतिनीधी :- इंटरनेटच्या जमान्यात जग जवळ आली आणि माणसे लहान जात आहेत, असे म्हटले जाते मात्र कोपरगाव तालुक्यातील वारी गावच्या ग्रामस्थांनी याला छेद दिला. या गांवात गेल्या १० ते १२ दिवसांपूर्वी फक्त जाधव एवढेच सांगणारे एक अनोळखी वयोवृध् आजोबा आले. त्यांची मनस्थिती थोडी बिघडलेली असल्याने त्यांना त्यांच्याविषयी काहीच सांगता येत नव्हते. ग्रामस्थ या आजोबांना दोन वेळेसचे जेवण देत होते. परंतु कडाक्याची थंडी वाढू लागल्याने त्यांचे खूप मोठया प्रमाणात हाल होऊ लागले. यातूनच माणुसुकीची जाण ठेवत येथील कामगार नेते संजय टेके, प्रा. रविंद्र जाधव, ग्रा. प. सदस्य महेंद्र बागुल आणि सोमैया विद्या मंदीरच्या सर्व शिक्षकांनी या आजोबांची शिर्डीच्या द्वारकामाई वृधाश्रमात राहण्याची कायमची व्यवस्था केली.
सोमवारी {दि. २२} वयोवृद्ध जाधव यांना नवीन कपडे घालून कामगार नेते संजय टेके यांनी उपलब्ध करून दिलेल्या सोमैया उद्योग समुहाच्या रुग्णवाहिकेत शिर्डी येथे त्यांना नेण्यात आले. सरपंच सतीश कानडे यांनी ग्रामपंचायतीचे रितसर पत्र घेतले. यावेळी ग्रा. प. सदस्य महेंद्र बागुल, प्रा. रविंद्र जाधव, जालिंदर महाले, किशोर सोनवने, अशोक नंनावरे, आदी उपस्थित होते. यासाठी ग्रा. प. सदस्य राहुल टेके, विशाल गोर्डे, अनिल गोरे, मछिंद्र महाराज टेके, योगीराज चव्हाण, आसाराम डहारे, आकाश पठाडे, गणपत सोनवने, विनोद झाल्टे आदींनी पुढाकार घेतला.