जळगाव, - चोपडा येथून चंद्रपूरला जाणारी 18 लाख रुपये किमतीची बनावट देशी दारुसह 10 लाख रुपये किमतीचा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. जळगावमधील गुजराल पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी राजेंद्र सुरेश खारकर, शीतल सुखदेव ब्राणे, धनराज उरकुडा चाक ले या तिघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेली ही सर्वांत मोठी कारवाई केली आहे. दारुचा हा ट्रक रवाना होणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार, तीन पथके तयार करुन त्याची विभागणी केली. एक पथक चोपडा, दुसरे धरणगाव व तिसरे एरंडोलजवळ तयार ठेवले होते.
जळगावमध्ये 18 लाखाच्या बनावट देशी दारूसह तीन जण अटकेत
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:00
Rating: 5