Breaking News

कुणकेश्‍वरची यात्रा नियोजन बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 25, जानेवारी - श्री क्षेत्र कुणकेश्‍वरची यात्रा 13 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी व यात्रेत येणार्‍या भाविकांना सर्व सोयी सु विधा मिळाव्यात या उद्देशाने घेण्यात आलेली पहिली यात्रा नियोजन बैठक प्रांताधिकारी नीता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंदिर परिसरात घेण्यात आली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींना यात्रा नियोजन बैठकीला निमंत्रण का दिले जात नाही, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला.कुणकेश्‍वरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त भरणार्‍या यात्रेचे नियोजन करण्यासाठी प्रांताधिकारी नीता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. 


ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य विभाग, विजवितरण विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, बीएसएनएल विभाग, अन्न व औषध, एस. टी., सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प रिषद बांधकाम विभाग आदी विविध विभागांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अधिकारी वर्गाकडून जे नियोजन सांगितले जात आहे त्याचा लेखी आराखडा सोमवार पर्यंत देवगड तहसीलदार याना सादर करावा अशा सूचना प्रांताधिकारी नीता शिंदे यांनी संबंधित भागाच्या अधिका-यांना दिल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रखडलेल्या कामांबाबत स्थानिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. यापुढील यात्रा नियोजन बैठकांना प्रतिनिधी पाठवणा-या अधिकार्‍यांनी स्वतः हजार राहावे अशी सक्त ताक ीदही शिंदे यांनी दिली. यात्रा नियोजन बैठकांना आमदार नितेश राणे याना निमंत्रित का केले गेले नाही अशी विचारणा स्थानिकांनी करताच ही बैठक प्राथमिक नियोजन साठी घेण्यात आली असून पुढील बैठकीत आमदार नितेश राणे यांना निमंत्रित करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल ,असेही शिंदे यांनी सांगितले. आमदार राणे यांच्या बरोबरच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य याना निमंत्रीत करावे असे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. यात्रा कालावधीत कुणकेश्‍वरमध्ये बीएसएनएल ची थ्रीजी ची सेवा उपलब्ध करून दिली जाणार असून कायमस्वरूपी 4-जी ची सेवा कुणकेश्‍वरमध्ये दिली जाणार असल्याची माहिती बीएसएनएल च्या अधिकार्‍यांनी दिली. देवस्थान ट्रस्ट कडून यात्रा कालावधीत मांसाहार व मद्यपान बंदी करण्यात आली असून अशा घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिकांचे भरारी पथकही असणार अशी माहिती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष पुंड लिक नाणेरकर यांनी दिली.