स्वच्छतेच्या प्रसारासाठी प्रजासत्ताक दिनी दुचाकींची रॅली
नवी मुंबई, दि. 25, जानेवारी - ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी दिघा - ऐरोली ते सी.बी.डी. बेलापूर या संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात 2 हजारहून अधिक दुचाकीस्वार रॅली काढणार आहेत.
‘माझा कचरा - माझी जबाबदारी’ ही भूमिका नागरिकांच्या मनात रूजवित व ‘माझी नवी मुंबई - माझा अभिमान’ हे घोषवाक्य प्रसारित करणार आहे. या बाईक रॅलीमध्ये सहभागी होऊ इच्छिणा-यानी क्रुझ इंडिया संस्थेचे प्रतिनिधी यांच्याशी 9920633039 अथवा 9920103038 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन मनपाच्या वतीने क रण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मे. क्रुझ इंडिया यांच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनी सकाळी 7.30 वा. ऐरोली पश्चिम येथील पटनी ग्राऊंडवरून या बाईक रॅलीला प्रारंभ होणार असून ही बाईक रॅली दिवा कोळीवाडा चौक, राबाडे, तळवली मार्गे घणसोली एन.एम.एम.टी. डेपो समोरून कोपरखैरणे तीन टाकी मार्गे वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अरेंजा कॉर्नर पासून पामबीच मार्गाने महापालिका मुख्यालायापर्यंत येऊन पुढे गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी मैदान, करावे तलावाजवळ नेरूळ याठिक ाणी सकाळी 9.30 वा. या रॅलीची सांगता होणार आहे. गिनीज बुक होल्डर मणी मंजुनाथन यांच्या नेतृत्वाखाली क्रुझ इंडिया यांच्या माध्यमातून या बाईक रॅलीचे आयोजन क रण्यात आले असून या बाईक रॅलीची नोंद ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये होणार आहे.