प्रज्ञा वाळकेंच्या अपहाराला संरक्षण देण्यासाठी शुक्राचारी प्रवृत्तींचा खेळ
मुंबई/विशेष प्रतिनिधी :सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता सर्वाधिकारी म्हणून काम करतांना श्रेय अपश्रेयाला सारखेच जबाबदार असायला हवेत, ही बाब प्रज्ञा वाळके यांना मात्र अपश्रेयाला अपवाद ठरविण्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील झारीचे शुक्राचार्य विशेष स्वारस्य दाखवू लागले आहेत. परिणामी शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागातील मनोरा आमदार निवास इमारतीच्या कोट्यावधीच्या अपहाराला जन्म देणार्या आई बापाची ओळख पटूनही या अपहाराला अनौरस अपत्य दाखविण्याचे छल कपट अद्यापही सुरूच आहे.
शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागात सन 2014 ते सन 2017 या आर्थिक वर्षात झालेल्या प्रत्येक कामात काही ना काही घोळ घालून गैरव्यवहाराला वाव देण्याचा पराक्रम कार्यकारी अभियंता पदावरील जबाबदार अभियंत्यांनी केला आहे, यापैकी अनेक प्रकरणांची वाच्यता होऊनही संबंधित अभियंत्यांवर कारवाई टाळण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न झाला. या कार्यकारी अभियंत्यांना या भ्रष्टाचारासाठी सजा मिळण्याऐवजी क्रीम पोस्टवर बदली किंवा बढतीचा नजराणा देण्याची तत्परता दाखवली गेली.
एकामागून एक गैरव्यवहारांची मालिका सुरू असतांना शहर इलाखा विभागाच्या भ्रष्ट कार्यशैलीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होऊ लागल्याने कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्या कार्यकाळात आजवरचा विक्रमी गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले.कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी मंत्रालय आणि आमदार निवास इमारतीतच भ्रष्टाचाराची नींव रोवून शहर इलाखा विभागाच्या भ्रष्टाचाराला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
शहर इलाखा साबां विभागातील प्रज्ञा वाळके यांच्या या अपहाराची चर्चा गेल्या सहा सात महिन्यांपासून सुरू आहे. या अपहाराला प्रज्ञा वाळके याच जबाबदार आहेत याचे सर्व पुरावे शासन प्रशासन दरबारी उपलब्ध आहेत.इतकेच नाही तर विधीमंडळाच्या कामकाजातही चर्चेच्या माध्यमातून प्रज्ञा वाळके कृत अपहाराची नोंद झाली आहे. सर्वार्थाने या अपहाराच्या जनक प्रज्ञा वाळके याच आहेत यावर शिक्कामोर्तब झाले असतानाही या अपहाराशी त्यांचा संबंध नाही हे सिद्ध करण्यासाठी साबांतील झारीतील शुक्राचार्य हातपाय मारीत आहेत.आई बाप माहीत असतानाही एखाद्या अर्भकाला अनौरस ठरविण्यासारखा हा निंदणीय प्रकार शहर इलाखा साबां विभागात सुरू असल्याने भ्रष्टाचाराला राजदरबारी सन्मान मिळवून देण्याची खेळी खेळली जात आहे.
साबांच्या चाडांळ चौकडीला मुसक्या
प्रज्ञा वाळके अपहार प्रकरणात मुख्य नायकासोबत दुहेरी भुमिका वठविणार्या चांडाळ चौकडीची ओळख पटली असून त्यांच्या कारनाम्यांची कुंडली मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांना देण्याची तयारी सुरू आहे .या चांडाळ चौकडीचे सदस्य कोण? म्होरक्या कोण याचा सविस्तर तपशील उद्याच्या अंकात.