Breaking News

विखेपाटील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये जिजाऊ जयंती उत्साहात


येथील विखेपाटील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये युवादिनी राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अभियांत्रिकीच्या चतुर्थ वर्षाच्या विदयार्थ्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन या वेळी केले होते. यावेळी प्राचार्य जे. जयकुमार, उपप्राचार्य के.बी.काळे,कलापुरे, करवंदे, पाठारे, भोसले आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. प्राचार्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.

या प्रसंगी प्रोफेसर मगर मार्गदर्शन करताना म्हणाले थोरामोठ्यांच्या जयंत्या साजऱ्या करताना त्यांनी घालून दिलेले आदर्श आपण अंगिकारले पाहिजे. फोटोला हार घालून आणि अभिवादन करून ध्येय साध्य होणार नाही. राजमातांचा आदर्श सर्वानी अंगिकारला पाहिजे.उत्तम समाज घडवताना आदर्शांची स्वतः अंमलबजावणी केली पाहिजे.