अंधश्रद्धा निर्मूलन समितिची शेवगाव तालुक्याची बैठक आज धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये बैठक पार पडली. शेवगाव येथे रेसिडेंशियल हायस्कूल येथे होणार्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या चर्चेसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती शेवगाव यांनी ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती कशाप्रकारे सहभागी असेल या चर्चेसाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. विज्ञान प्रदर्शनामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विविध पुस्तकांचे स्टॉल लावून, अंधश्रद्धा निर्मूलनाचे पोस्टर्सचेही प्रदर्शन या विज्ञान प्रदर्शनामध्ये होणार आहे. होत असलेल्या विज्ञान प्रदर्शनाच्या तयारी साठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शेवगाव तालुक्याचे अध्यक्ष प्राध्यापक किसन माने, मा. प्राचार्य शिवाजी देवढे, कार्याध्यक्ष संजय नांगरे, डॉ. गणेश चेके, प्रा. चिमाजी धनवडे, सचिव भागवत वेताळ, ज्ञानेश्वर जवरे, प्रसिद्धीप्रमुख रवींद्र उगलमुगले, अजय मगर, रोहित मगर आदी मांन्यवर या बैठकीला उपस्थित होते.
अंनिस मार्फत विज्ञान प्रदर्शना दरम्यान पोस्टर्स प्रदर्शन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:19
Rating: 5