Breaking News

सांगलीत राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी


सांगली,  सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती आज शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या माजी जिल्हाप्रमुख सुनिता मोरे, वैशाली माने व पूनम पाटील यांच्याहस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन क रण्यात आले.या कार्यक्रमात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ’शिवजन्मोत्सव सोहळा 2018‘च्या नियोजनासाठी 21 जानेवारी रोजी सांगली जिल्हास्तरिय बैठकीचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले.