Breaking News

महिलांच्या दागिन्यांवर आली संक्रांत


राहुरी प्रतिनिधी :- मकरसक्रांती दिनी देवीच्या मंदीरात पूजेसाठी आलेल्या दोन महिलांच्या प्रत्येकी ५ तोळे सोने धूमस्टाईलने चोरून नेले. राहुरी कारखाना परिसरातील वैष्णवी चौकात ही घटना घडली. महीला भगिनी सुगडेपूजन करण्यास आल्या असता दुपारी साडेतीन वाजता येथील मोनिका विटनोर यांच्या गळ्यातील पाचतोळे सोन्याचे गंठन ओरबाडून चोरट्यांनी पोबारा केला. दरम्यान, शहरातील आनंदऋषी उद्यान येथून गणपती मंदीरात पुजा करुन घराकडे निघालेल्या पुरुषोत्तमनगर येथील सुनिता खळेकर या महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्याचे गंठण अज्ञात चोरटयांनी ओरबाडून नेले.