Breaking News

शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शेटे


राहुरी: राजमाता, राष्ट्रमाता माँ जिजाऊ जयंतीनिमित्त मराठा कार्यालयात जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेप्रमाणे १९ फेब्रुवारीला करण्याचे यावेळी ठरले. दरम्यान, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राहुरी येथील प्रसिद्ध वकील राहुल शेटे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नावाचा ठराव राजेंद्र लबडे यांनी मांडला. सर्व सदस्यांनी तो एकमताने ठराव पारित केला. नवीन कार्यकारिणीमध्ये संदीप गाडे, प्रशांत मुसमाडे, संदिप कवाने, कांता तनपुरे, अविनाश पवार, सागर शेटे, नवनाथ सप्रे, दिनेश झावरे, रमेश म्हसे, प्रदिप भुजाडी, शरद तनपुरे, महेंद्र शेळके, सौरभ उंडे, कुलदीप नवले, सचिन चौधरी आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे शिवजयंती पालखी मिरवणुकीदरम्यान पालखीला खांदा देण्याचा मान मुस्लिम बांधवाना देण्याचा ठराव यावेळी करण्यात आला.