Breaking News

भूगोल प्रज्ञाशोध स्पर्धेत ‘श्रमिक’चे सुयश


संगमनेर / प्रतिनिधी:- शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयातील इ.११ वी विज्ञान शाखेचा सर्वेश जंगम या विद्यार्थ्यास भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा मुंबई, यांनी आयोजित केलेल्या परीक्षेत सिल्व्हर मेडल मिळाले. तर अखिल भारतीय विज्ञान परिषद छात्रभारती आयोजित युवा स्पंदन, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व अण्णासाहेब शिंदे जयंती महोत्सव तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निखिल भेंडाळेचा प्रथम क्रमांक, पंचायत समिती आयोजित स्वच्छ महाराष्ट्र करंडक २०१८ मध्ये प्रसाद गोडसे याचा तृतीय क्रमांक आला. या यशाबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बिहारी डंग, उपाध्यक्ष डॉ. सोमनाथ सातपुते, कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी, प्राचार्य डॉ. के. के. देशमुख, उपप्राचार्या प्रा. मेधा शिरोडे, पर्यवेक्षक प्रा. डॉ. शांताराम रायसिंग तसेच शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. सदर विद्यार्थ्यास प्रा. अप्पासाहेब गुंजाळ, प्रा. भोजने नामदेव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मराठी वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रा. शिंदे सारिका यांचे मार्गदर्शन लाभले.