कोपरगाव ता. प्रतिनिधी :- तालुक्यातील संवत्सर रेल्वेस्टेशन उत्पन्न कमी होत असल्याच्या नावाखाली बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. संवत्सर आणि संवत्सर रेल्वेस्टेशन परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना या रेल्वेचा खूप उपयोग होतो. यात दहेगाव बोलका, लौकी, गोधेगाव, घोयेगाव, कासली, तळेगाव मळे, भोजडे, खोपडी, धोत्रा तसेच वैजापूर तालुक्यातील काही गावातील हजारो रेल्वे प्रवाशी या रेल्वेसेवेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एका शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे सोलापूर विभागाचे अप्पर मंडल रेल प्रबंधक मल्लिनदरसिंग उप्पल यांना निवेदन दिले. यावेळी कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक बाळासाहेब बारहाते, नानासाहेब डोंगरे, अशोक भोकरे, रणजीत जगताप, योगेश तळे आदी उपस्थित होते. निवेदन देवून संवत्सर रेल्वे स्टेशन पूर्ववत सुरु करण्याचे साकडे घातले.
संवत्सर रेल्वे स्टेशन पूर्ववत सुरु करा ; रेल्वे प्रबंधकांकडे मागणी
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:57
Rating: 5