देर्डे को-हाळे परिसरातील राष्ट्रीय महामार्ग रद्द करावा
आ. कोल्हे यांनी या निवेदनात म्हटले आहे, की देर्डे को-हाळे परिसरातील बागायती शेती नवीन नागपुर, मुंबई समृध्दी महामार्गासाठी मोठया प्रमाणात अधिग्रहीत होत आहे. शिर्डीच्या प्रांताधिकाऱ्यांनी देर्डे को-हाळे परिसरातील सर्व्हे क्रमाणकं २८२, २८३, २८४, २९०, २९१, २९५, २९९,८५, २८५, ४०, ४२, ४३, ७२, ३०३ ते ३५३ आदी क्षेत्रातील जमीन भूसंपादित करण्यासाठी बागायतदार शेतक-यांना नोटीसा बजावल्या आहेत. येथील शेतकऱ्यांवर रस्त्याबाबत सातत्याने अन्याय होत आहे. बागायती शेतीने यात मोठे नुकसान होत आहे. हे सर्व शेतकरी भूमीहिन होणार आहेत. तेंव्हा नव्यांने शिर्डी रूंदीकरणात प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग १६० रद्द करावा, अशी मागणी येथील शेतकरी सर्वश्री अरूण येवले, माजी सरपंच साहेबराव शिंदे, विष्णू डुबे, राजेश डुबे, राजेंद्र गवळी, देवराम गवळी, ज्ञानेश्वर देशमुख, विठठलराव डुबे, हरिभाऊ कोल्हे, सोपानराव गवळी, भरत डुबे, मंदाकिनी डुबे आदिंनी केली आहे.
