Breaking News

कन्या विद्यालयाची कबड्डीत मुसंडी

जामखेड येथील रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयाने कबड्डी या खेळात नाशिक विभाग स्तरावर मुसंडी मारुन कन्या शाळेच्या इतिहासात प्रथमच विजेतेपद पटकावले आहे. कोकमठाण येथे पार पडलेल्या जिल्हास्तरिय क्रीडा स्पर्धेत कन्या विद्यालयाने मुलींच्या गटात निर्विवाद यश मिळवत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यालयात परतल्यावर या मुलींच्या चेहर्‍यावरचा आनंद पालकांच्या उपस्थितीने द्विगुणीत झाला होता. साक्षी आजबे, क्षितीजा वटाणे, प्राची यादव, भोसले मनिषा, भोसले अष्लेशा, उतेकर वैष्णवी, फाळके शितल, तनपुरे प्रिया , पोटफोडे पुजा, मेघडंबर त्रिवेणी या खेळाडू मुलींचे पालकही यावेळी उपस्थित होते.लवकरच या मुली नाशिक येथे विभागीय स्पर्धेसाठी रवाना होणार आहेत.

विभागीय क्रीडा संकुल समिती, नाशिक महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे नाशिक महसूल विभागाने नर्सरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी लेटस् प्ले हा एक नाविण्यपुर्ण उपक्रम राबविला आहे. आजच्या मोबाईलच्या जमान्यात प्रत्येक विद्यार्थ्यांला विविध खेळांमध्ये आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या संकल्पनेतून प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांना कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, मैदानी खेळ, वुशू, योगासने अशा खेळांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. सप्टेंबर 2017 पासून हा उपक्रम शाळापातळीवर राबविण्यात आला. यावेळी स्कूल कमिटीचे अध्यक्ष विष्णुपंत मुरुमकर म्हणाले, मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य अशा स्पर्धांमधून वाढीस लागून सक्षम पिढी तयार होणार आहे. मुख्याध्यापिका मेढे एम्. एस.् यांनी यावेळी पालकांचे स्वागत केले, वुशू या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळविणा-या कु.कानडे तेजस्वीनी जगदीश या मुलीला तसेच क्रीडा प्रशिक्षक बापुराव मडके यांना राजेंद्र कोठारी, विठ्ठल राऊत, प्राचार्य संपत काळे , दिलीप ढवळे व संतोष बारगजे यांनी सर्व खेळाडुंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.