Breaking News

दैनंदिन व्यवहारात इंग्रजीचा वापर वाढवावा ः ढाकणे

पाथर्डी / श. प्रतिनिधी । 21 ः इंग्रजी ही अंतरराष्ट्रीय भाषा असल्यामुळे तिचा दैनंदिन व्यवहारात वापर वाढवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन बाबूजी आव्हाड महाविद्यालयात इंग्रजी स्पीच कॉम्पिटिशन उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांनी केले.


पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या बाबूजी आव्हाड महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. मुलांमध्ये इंग्रजी भाषेबद्दल आत्मविश्‍वास वाढवा, या दृष्टिकोनातुन संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. मन्सूर शेख व प्रा. दीपक पावसे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. सदर स्पर्धेस पर्यवेक्षक शेखर ससाणे, प्रा. रमेश मोरगावकर, प्रा. नाथा मोहिते, प्रा. सचिन पालवे, प्रा. महारुद्र घुले, प्रा. सलीम शेख, प्रा. सुनील कचरे, प्रा. सुरेख चेमटे, प्रा. आशा पालवे आदी उपस्थित होते. या स्पेर्धेस कला व वाणिज्य शाखेतील अभिषेक कोकाटे, तारे मोरेश्‍वर, फुटाणे प्रतीक्षा, मयुरी थोरात, प्रतीक्षा काटकर यासह अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. मन्सूर शेख व आभार प्रा. दीपक पावसे यांनी मानले.