Breaking News

‘नाशिक रन’मध्ये धावले हजारो नाशिककर

नाशिक  - समाजातील गरजू आणि वंचित घटकांना हात देण्याची कटिबध्दता अधोरेखित करीत आज सकाळी हजारो अबालवृध्द धावले. विशेष बालके, दिव्यांग, महिला, तरूणाई, ज्येष्ठ नागरिक आदींसह विविध घटकांचा उत्स्फूर्त सहभाग हे नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टद्वारा आयोजित ‘नाशिक रन’ उपक्रमाच्या सोळाव्या अध्यायाचे खास वैशिष्ट्य राहिले. सुमारे चार तासांहून अधिक वेळ चाललेल्या या उपक्रमातील ओसांडून वाहिलेला उत्साह नाशिककरांच्या प्रवाही जीवनशैलीचे द्योतक ठरले.


महात्मा नगर क्रीडांगणावर सकाळी आठ वाजता राष्ट्रगीताने नाशिक रनला उपक्रमाला प्रारंभ झाला. संजिवनी जाधव, कविता राऊत किशन तडवी यांनी नाशिक रन ज्योत प्रज्वलित करुन औपचारिक उद्घाटन केले. व्यासपीठावर नाशिक रनचे अध्यक्ष एस.एच बॅनर्जी, उपाध्यक्ष एच. बी. थोन्टेश, बॉश इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौमित्र भट्टाचार्य, टीडीके एप्सकॉसचे व्यवस्थापकीय संचालक तथा नाशिक रनचे संस्थापक विश्‍वस्त माजी अध्यक्ष नटराजन बालकृष्णन, सचिव अनिल दैठणकर, राजाराम कासार, यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम महापौर रंजना भानसी यांनी मॅरेथॉन खेळाडूंच्या चमूला हिरवी झेंडी दाखवली. पहिला चमू धावण्यासाठी मार्गस्थ झाल्यानंतर दिव्यांग आणि विशेष मुलांना भट्टाचार्य यांनी हिरवा झेंडा दाखवला. याच श्रृंखलेत पूढे लहान बालके, विदेशी पाहुणे, विशेष आमंत्रित, विविध कंपन्याचे कर्मचारी, नाशिक इंजिनिअर्स ग्रुप, नाशिक रनचे स्वयंसेवक एकानंतर एक झेंडा दाखवताच धावले. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने नाशिककरांनी सहभाग घेऊन समाजाप्रती आपली कटीबद्धता जोपासली.

महात्मा क्रीडांगणापासून रिलायन्स फ्रेश-परिजात नगर, वर्ल्ड ऑफ टायटन-मधू इंडस्टीज, परत समर्थ नगर, पारिजात नगर, सिक्स सिग्मा हॉस्पिटल‘ व महात्मा नगर त्याचप्रमाणे प्रौढांसाठी महात्मा नगर-रियालन्स फ्रेश, पारिजात नगर, वर्ल्ड ऑफ टायटन, रॉकेट सर्कल, जेहान सर्कल, स्वामी समर्थ सर्कल, आयसीआईसीआय एटीएम, परत रॉकेट सर्कल समर्थ नगर पारिजात नगर, महात्मा नगर, क्रीडांगण अशा मार्गावर हजारो अबालवृद्ध सामाजिक बांधिलकीची जाणीव मनात बाळगून धावले.यावेळी अविनाश चितांवर, मुकुंद भट, अतुल खानापूरकर, संदीप पांडे, प्रबळ रे, हेमंत जोशी, रोहन तनितीश देशमुख, गिरीश कौशिक यांची उपस्थिती होती. सूत्रसंचलन अतूल आणि शिल्पा यांनी केले. आभार प्रशांत दैठणकर यांनी मानले.